ई-लर्निंग

शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो. वेळोवेळी शिक्षकांना प्रशिक्षणाचा लाभ करून दिला जातो.आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून बालवाडीपासून इ.७ वी पर्यंतच्या सर्व वर्गाना प्रशिक्षित शिक्षकांमार्फत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तासिकांमध्ये ई-लर्निंगची विभागणी वर्गवार करून त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नेमण्यात आला आहे.

सुसज्ज कम्प्युटर लॅब

विद्यार्थ्यांना इ. २ री पासून संगणक प्रशिक्षण दिले जाते. यासाठी अभ्यासक्रम तयार करून प्रशिक्षित शिक्षकांमार्फत इ. ७ वी पर्यंत त्यांना टप्प्या-टप्प्याने संगणक विषयातील मूलभूत ज्ञान दिले जाते.

विज्ञान प्रयोग शाळा

विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करावेत यासाठी त्यांना प्रयोग शाळेत सराव करून घेतला जातो. प्रात्यक्षिकांमधून अध्ययन दृढ केले जाते.

स्पर्धा परीक्षा विभाग

इ. ४ थी पासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना बसविले जाते.TSE,5 वी साठी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा, इंग्रजी प्री.एलिमेंटरी, एलिमेंटरी व इंटरमिडिएट परीक्षा,हिंदी राष्ट्रभाषा प्राथमिक व प्रवेशिका, विज्ञान तरंग, डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा, इ. ७ वी साठी स्कॉलरशिप पूर्वतयारी साठी TSE. अशा परीक्षांमधून त्यांची ज्ञानाची पातळी वाढवली जाते.

ग्रंथालय

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालयातून त्यांना अनेक संदर्भ साहित्यांचा लाभ करून दिला जातो.

पालक मेळावे

पालकांशी आपल्या पाल्यांच्या विकासासाठी मनमोकळा संवाद साधता यावा यासाठी पालक मेळाव्यांचे नियमित आयोजन केले जाते.

व्याख्याने

विध्यार्थ्यांना ज्ञानवाढीसोबतच करिअर विषयक जागरूकता निर्माण व्हावी व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांची भूमिका समजावी यासाठी व्याख्यात्यांचा लाभ करून दिला जातो.

सहशालेय व शाळांतर्गत स्पर्धा

वक्तृत्त्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,बुद्धिबळ स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा,श्लोक पाठांतर स्पर्धा यांमधून विकास साधला जातो. शैक्षणिक क्षेत्रात सजगता व प्रयत्न यातून अनेक छोटे छोटे उपाय करून आम्ही आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्मिती करून त्यांना सुयश प्राप्त करून देणेस आम्ही कटीबद्ध आहोत.

Website developed by TRIMENS