श्रीराम विद्यालय, कोल्हापूर
शिक्षणातील प्रयोगशीलतेची ..............,नवनवीन शैक्षणिक उपक्रमांची ………,
स्पर्धात्मक युगातील विजयाची .............., नवीन पिढयांच्या जडणघडणीची........,
डिजीटल तंत्रज्ञानाच्या वाटचालीची ........, पालकांच्या विश्वासाची........,
पाल्यांच्या यशस्वीतेच्या गाथेची अन ........, श्रीराम शिक्षण मंडळ परिवाराच्या अभिमानाची........
समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या जाणीवेतून 7 ऑक्टोबर 1935 रोजी कै. विष्णू गणेश बेनाडीकर यांनी या शाळेची स्थापना केली. गुणवत्तापूर्ण शाळा या आकांक्षेला मनी ठेवून त्यांनी श्रीराम विद्यालय रुपी बीज श्रध्देनं लावलं व त्यास खंबीरपणे साथ दिली ती त्यांच्या पत्नी कै. प्रमिलादेवी विष्णू बेनाडीकर यांनी.
आज विविध क्षेत्रांमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी देश परदेशात उच्चपदस्थ स्थान भूषवित आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सजगता व सकारात्मक प्रयत्न यातून आम्ही आपल्या पाल्यांसाठी दर्जेदार शिक्षण प्राप्त करुन देण्यास कटीबध्द आहोत.